Ameriket Swami Vivekananda (Marathi)-अमेरिकेत स्वामी विवेकानंद
₹60.00
In stock
SKU
BDC00043
Language: MARATHI
संघटनेची मूलभूत तत्वे आचरण्यासाठी स्वामी विवेकानंद तरुणाना सांगतात, "वत्सांनो, कार्य सुरु करून द्या - तुमच्यामध्ये अग्नि प्रज्वलित होइल. संघटित होउन कार्य करण्याची क्षमता आपल्या अंगी मुळीच नाही, ती आता आपल्या अंगी आणली पाहिजे आणि याचे रहस्य जर कशात असेल तर ते मत्सराच्या अभावात आहे. आपल्या बंधुंशी, आपल्या सहकार्यांशी सर्वदा सहमत होण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि त्यांच्याशी नेहमी जुळते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संघटित होउन कार्य करण्याचे हेच रहस्य होय. शूरपणाने परिस्थितीला तोंड द्या. जीवन क्षणभंगुर आहे . ते एखाद्या महान कार्यासाठी वेचा. आपण कोणत्याही एखाद्या विशिष्ट सम्प्रदायाला जाऊन मिळता कामा नये. साऱ्याच संप्रदायांविषयी सहानुभूती बाळगून त्यांच्याशी मिळून मिसळून आपण कार्य केले पाहिजे ---- कामाला लागा - कामाला लागा- सर्वाना आपल्या प्रेमाने जिंकून घ्या ! - - - - विस्तारासाठी सर्वदा प्रयत्न करीत राहा. गती व वाढ हेच जीवनाचे एकमेव चिन्ह आहे हे ध्यानात ठेवा . - - - - - भय कसले ! आणि कोणाला भ्यायचे ! दृढ़ निश्चयाने कार्याला लागा !'
हा दिव्य सन्देश स्वामी विवेकानंदानी सांगितला. ते केवळ उपदेश देवून थांबले नाहीत . अमेरिकेत काम करीत असताना त्याना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले, अपमान सहन करावा लागला. आपण फक्त त्यांचे शिकागोचे भाषण ऐकतो, ऐकवतो परन्तु त्याच्या आदल्या रात्रि ते एका मालगाडीच्या डब्यात कडाक्याच्या थंडीत झोपले होते य़ा व अशा अनेक अडचणींना, आव्हानांना ते कसे सामोरे गेले याचा अभ्यासपूर्ण आढावा य़ा पुस्तकात घेतला आहे .
Publication Year | 2011 |
---|---|
VRM Code | 1842 |
Edition | 1 |
Pages | 120 |
Volumes | 1 |
Format | Soft Cover |
Author | Nivedita Raghunath Bhide |
Write Your Own Review